12ऑगस्टचा अनुभव – ऊसाची नवी दिशा शोधताना
12 ऑगस्टच्या पहाटे पुण्यातून निघालो. सुर्योदयाची पहिली किरणं अजून डोंगरावर खेळत होती आणि मी प्रवास सुरू केला कडेगावकडे — सांगली जिल्ह्या म्हणजे ऊसाचा गड.
गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक दृश्य सतत डोळ्यासमोर दिसत होतं— महिंद्राचे पिकअप आणि त्यात ऊसाची रोपे भरलेली कॅरेट या दिवसात पाश्चिम महाराष्ट्रात हा व्यवसाय अक्षरशः जोरात चालू आहे असे दिसले .
अनेक शेतकऱ्यांची शेतं पाहत पाहत मी माझ्या जिवलग मित्र आदित्य यांच्या शेतात पोचलो. तिथे ऊसाची लागवड सुरू होती. आदित्यला मी हसतच म्हटलं,
“अरे, एक गोष्ट लक्षात आली का तुला? रोपावर फॉस्फेटची कमतरता दिसतेय.”
तो म्हणाला, “हो मला हि दिसतंय , मी म्हनालो तू नर्सरी मध्ये जाऊन तपासणी केलीच नाही वाटत.”
मी त्याला समजावलं की ऊसाच्या रोप आणि ज्या उसा पासून डोळे काढतात किंवा त्याचा डोळा घेतात त्याच वय ऊसाचा वय आणि तो नवीन आहे का खोडवा त्याला खूप महत्व आहे.
माझ्या ऊस पिकातील अनुभव नुसार ७ ते ८ महिन्यातील ऊस हा रोपाच्या निवडी करीत बेस्ट असतो . आम्ही यावर काही प्रयोग सुद्धा केले होते ( जर वरचा डोळा निवडला तर खूप लवकर फुटतो (जर्मिनेशन ) पण तो ताण सहन करत नाही
गप्पा पुढे चालू असताना त्याने सांगितलं की, “इथले नर्सरीवाले रोप , मजूर आणि सल्ला सगळं एकत्र देतात.”
मी विचारलं, “मग गेल्या वर्षी उत्पादन किती आलं?”
तो म्हणाला, “४० ते ६० टन.”
मी पुन्हा विचारलं, याने उत्पादन वाढलं का?”
तो थोडा शांत झाला, “नाही... पण खर्च मात्र वाढतोय.”
आणि जमीन खराब होत आहे ती वेगळी समस्या
ऊस पिकांमध्ये डॉ. ग्रीन इंडिया टीम पूर्णपणे सपोर्ट करते त्या साठी आपल्यला खालील फॉर्म भरून देणं गरजेचा आहे
त्या क्षणी आम्ही दोघांनी ठरवलं — चला, यावर प्रयोग करू. एक एकरमध्ये नवा पद्धतीने प्रयोग करूया आणि पाहूया खरी दिशा कोणती.
त्यावर आमच्या एक मित्र लारा याने आळवणी (ड्रेंचिंग) हा विषय काढला..
त्यावर बोलूया उद्या च्या भागात.
लेखक
रवींद्र बोटवे / टीम डॉ. ग्रीन इंडिया
7030123248