DrGreenIndia Logo DrGreenIndia

अन्न धान्य किंमती का नाही वाढत ?

August 7, 2025

घरातील साबणी पासून ते सळई , वीट ते मोठया कार पासून च्या  किंमती दुप्पट झाल्या पण त्या प्रमाणत आज सुद्धा गहू , ज्वारी , सोयाबीन यांच्या किंमती का नाही वाढल्या असा प्रश्न अनेकांना पडतो ?

मग याचे उत्तर काय असेल याचा आज शोध घेऊया 

१ . कमी किंमत लवचिकता (low price elasticity of demand ) आपण हे अर्थशास्त्रात शिकलो आहोत 

आपल्या भाषेत - जर गहू २ ० ०  रु झाला तरी लोक गहू खरेदी करतात असे नाही की उपाशी राहू आणि जरी गहू ४ ०  झाला तरी लोक काही घरी गोदाम भरून ठेवत नाहीत . यावरून दिसते की लोकांची यावरील गरज बदलत नाही . 

 डॉ . ग्रीन इंडिया ग्रुप वर यावर एकदा आपण चर्चा केली होती - https://chat.whatsapp.com/KPvvaFN7AUA0mVdIwvpfr6

२ . जगात आज सर्वच पिकत आहे - जसे की जे केशर फक्त काश्मीर मध्ये भेटत होत ते आज आपल्या पुण्यात तयार होत आहे .. तसेच गहू , सोयाबीन , मका , ज्वारी हे जगात अनेक भागात पिकत आहे ( आज गेल्या ५ -६  वर्षांमध्ये सोयाबीन हे पश्चिम महाराष्ट मध्ये वाढले ) याचा अर्थ ग्लोबल उत्पादन वाढत आहे . 

३ . सरकारी नियंत्रण - अनेक देशात subsidy , msp या अन्न धान्य किंमत नियंत्रण मध्ये किंवा जर किंमत खूप कमी झाली तर त्याचा साठा करून ठेवल्या जातात किंवा तो साठा बाजारात आणला जातो ( जसे कांदा १ ० ०  ला गेला की मार्केट मध्ये सरकार नाफेड कांदा आणते किंवा खूप कमी झालें तर खरेदी करते 

४ . टेकनॉलॉजि आणि सारखा पीक पॅटर्न - आज कोणत्या देशात काय होईल तिथं किती पिकेल म्हणजे किती उत्पादन होईल याचा अंदाज अनेक मोठ्या कंपन्या सिस्टिम  आणि मॉडेल लावून ठरवतात . त्या मुळे कुणी फार काही स्टॉक करून ठेवत नाही कारण गणित सोपे आहेत खरीप सीजन म्हणजे सोयाबीन , कापूस आणि तूर त्या मुळे ग्लोबल प्लेअर लगेच घाई मध्ये येऊन खरेदी किंवा विक्री करत नाहीत 

५ .मोठया साठवणूक यंत्रना - आज अनेक ठिकाणी खूप मोठे गोदाम झाले आहेत त्या मुळे थोडे काही वर खाली झालं की बाजारात उतरतात - विक्री किंवा खरेदी साठी 

६ .बफर स्टॉक - अनेक देश काही कमी जास्त होईल ( पूर , दुष्काळ ) असे काही मोठं संकट आले तर बफर स्टॉक ठेवते . 

७ . हेज मार्केट ( करार पद्धत ) आज शेअर मार्केट सारखे कमोडिटी मार्केट आहे . जसे  १ ० ०  टन सोयाबीन लॉट मी आज २ ५ ० ० दराने विकणार असा करार करू शकतो ( एक example उदा .देत आहे ) असे कॉन्ट्रॅक्ट होतात जो स्थिरता आणि जोखीम कमी करतो . 

डॉ. ग्रीन इंडिया मध्ये आम्ही नेमहीच योग्य माहिती , कृषी विज्ञान आणि मूळ समस्या यावर काम करतो . 

हा लेख chatgpt किंवा कोणाचा कॉपी नाही हे आम्ही १ ० ०  % सांगू शकतो . कारण आम्ही गेल्या १ ५  वर्षांपासून शेतकरी मित्रांसोबत बांधवार काम करतो 

शेतीविषयक समस्या साठी आपण - 7030123248 या हेल्पलाईन वर संपर्क करू शकता  

लेखक

डॉ. ग्रीन इंडिया टीम / रवींद्र बोटवे 

 

19