2012 – आदिवासी शेतकऱ्यांचे प्रशिक्षण
दक्षिण गुजरातमध्ये शाश्वत शेती पद्धती.
आम्ही आज जे शेतीचे चित्र पाहत आहोत त्याने आमचे मन शांत बसू देत नाही. पूर्ण देशातील शेतकरी — जे आपल्याला अन्न देतात — ते आज संघर्ष करत आहेत . पिकावरील खर्च वाढत आहे , नफा कमी होत आहे आणि सर्वात महत्वाचे ज्यावर पूर्ण देशाचे आरोग्य चालत ती माती मरत आहे आणि ताटात विष पसरत आहे. पण ज्या वेळी आम्ही देशातील सर्वोत्तम शेतकऱ्यांना भेटलो त्या वेळी आम्ही एक साधी पण शक्तिशाली गोष्ट शोधली: शेती फक्त तेव्हाच काम करेल —ज्या वेळी मातीबलवान असेल — . म्हणून २०१२ मध्ये, आम्ही DrGreen India सुरू केले — एक संकल्प घेऊन की कृषी विज्ञान प्रसार , शेतकऱ्यांना योग्य सल्ला देणे, योग्य साधने उपलब्ध करून देणे आणि नफा व पर्यावरण एकत्र वाढवणे. कारण जेव्हा माती जिवंत असते, तेव्हा सर्व काही जिवंत असते.
शेतीला आणि मातीला पुन्हा एकदा जिवंत करूया
स्मार्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने – शेतकऱ्याला बळ, शेतीला उत्पादन, आणि माणसाला निसर्गाशी नातं देणं.
आम्ही सुरक्षिततेला नेहमी पहिले स्थान देतो.
भावना नाही, विज्ञानावर विश्वास ठेवतो.
नवकल्पना, सहकार्य आणि पारदर्शकतेवर आमचा भर आहे.
जेव्हा तुम्ही लोकांच्या जीवनात खरी किंमत (व्हॅल्यू) निर्माण करता… तेव्हा नफा आपोआप येतो.
दक्षिण गुजरातमध्ये शाश्वत शेती पद्धती.
शाश्वत कार्यक्रमाचा भाग म्हणून प्रत्यक्ष प्रशिक्षण.
दक्षिण गुजरातमध्ये फळ-भाजीपाला उत्पादक कंपनी.
देशव्यापी मोहीम, माती आरोग्य मूल्यांकन व पुनरुत्पादक पद्धतींचा प्रसार; प्रशिक्षण कार्यक्रम, माती आरोग्य पुस्तक, शेतकरी बैठक, पुरस्कार इ.